Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

३ महिने कर्जाचे हप्ते स्थगित करण्याच्या EMI वर मोठा निर्णय !

सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या ८० कोटी गरीबांना मोठा दिलासा सरकारने दिला आहे. त्यांच्या खात्यात विविध योजनांद्वारे तब्बल १.७ लाख कोटी रुपये थेट टाकण्यात य़ेणार आहेत. तसेच खासगी कर्मचारी, शेतकरी, महिला, अपंग, वृद्धांसह अनेक वर्गांना लोकडाऊनच्या पार्शवभूमीवर मदत देऊ केली आहे. आता कर्जांचे हप्ते भरणाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याचा विचार सुरु आहे.

सर्व कर्जाचे हफ्ते ३ महिन्यांसाठी थांबवण्याचा सल्ला आरबीआयनं सर्व बँकांना दिला आहे. बँकांना ईएमआयवर 3 महिन्यांसाठी दिलासा देण्याचा आदेश नव्हे, तर फक्त सल्ला देण्यात आला आहे. तथापि, आरबीआयने केवळ सल्ला दिला असल्यानं आता चेंडू बँकांच्या कोर्टात आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आता ईएमआयवर सूट द्यायची की नाही, याचा निर्णय बँकांनी घ्यायचा आहे. तसेच कोणत्या ईएमआय सवलत देत आहेत हे फक्त बँकाच ठरवतील. याचा अर्थ असा आहे की किरकोळ, व्यावसायिक किंवा इतर प्रकारच्या कर्जासाठी हे अजूनही अस्पष्ट असल्यानं हा एक प्रकारचा गोंधळ निर्माण करणारा निर्णय आहे.

करोनाचे संकट आणि अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारपाठोपाठ रिझर्व्ह बँकेने आज मोठी घोषणा केली. बँकेने प्रमुख व्याजदरात ०.७५ टक्क्याची कपात करून तो ४.४० टक्के करण्यात केला आहे. त्याशिवाय ३ महिने कर्जाचे हप्ते स्थगित करण्याच्या सल्ला बँकांना देण्यात आल्या आहेत. या निर्णयाने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.




देशात कोरोनामुळे कंपन्यांचे काम ठप्प झाले आहे. एकतर वर्क फ्रॉम होम किंवा घरी सुटीवर जाण्याची मुभा कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. तर असंघटीत क्षेत्रामध्ये अनेकांचा रोजगार बुडाला आहे. यामुळे कर्जाचा परतावा करण्यासाठी लोकांची त्रेधातिरपट उडणार आहे. हे हप्ते भरणे अनेकांना मुश्किल होणार आहे. यामुळे त्यांचा सिबिल स्कोअरही कमी होणार आहे. कर्ज थकल्यास पुन्हा कर्ज मिळणे मुश्किल होणार आहे. यामुळे आरबीआय लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

भारतीय बँक संघाटनेने यापूर्वीच आरबीआयसोबत यावर चर्चा केलेली आहे, एका अधिकाऱ्याने अमर उजालाला सांगितले की, यावर विचार केला जात आहे. रिझर्व्ह बँकेकडूनच यावर तोडगा काढला जाऊ शकतो.

ईएमआयची तारीख चुकल्यास किंवा त्या तारखेला ईएमआय भरण्यासाठी पुरेशी रक्कम खात्यावर नसल्यास बँका ग्राहकावर दंड आकारणार नाहीत. ईएमआय बाऊन्स झाल्यास याआधी दोन्ही बँकांकडून ग्राहकाला जबर दंड आकारला जात होता. शिवाय सिबिल स्कोअरही खाली येत होता. यावर आरबीआय दिलासादायक घोषणा करण्याची शक्यता आहे.

देशवासियांचे ईएमआय काही महिने थांबवावेत अशी मागणी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच पत्र पाठवून केली आहे. यामध्ये त्यांनी मोदींच्या कामाचीही स्तुती केली आहे. तसेच कर्जदारांना कमीतकमी सहा महिने ईएमआयपासून सुटका द्यावी, अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हानांनीही ही मागणी केली होती.





महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड