Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आयटीआय विद्यार्थ्यांना मिळणार विद्यावेतन, कोणाला मिळणार लाभ? जाणून घ्या  – ITI Admission 2023

ITI Admissions 2023  

ITI Stipend 2023

ITI Admissions 2023 : Students belonging to Scheduled Castes, Scheduled Tribes, Freed Castes and Nomadic Tribes, Other Backward Classes, Special Backward Classes, Minority Communities, as well as Economically Backward Sections of the Open Category were earlier given a tuition fee of Rs 40 per month. It has now been reduced to Rs.500. This decision has been taken in the state cabinet and the government decision will be published soon. Check ITI Admissions 2023  at below:

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक समाज, तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना यापूर्वी मासिक ४० रुपये विद्यावेतन दिले जात होते. ते आता ५०० रुपये करण्यात आले आहे. हा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला असून, लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध केले जाणार आहे.

या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना पूर्वी ५०० रुपये विद्यावेतन दिले जात होते. तसेच इतर एससी ६० रुपये, ओबीसी व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० रुपये रुपये महिना विद्यावेतन दिले जात होते. आता सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५०० रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.

 सप्टेंबर महिन्यापासून अमलबजावणी

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन चाळीस वर्षापासून केवळ ४० रुपये एवढे आहे. वाढती महागाई पाहता ते अपुरे आहे. त्यामुळे विद्यावेतनात वाढ करावी, अशी मागणी विद्यार्थ्याकडून वारंवार होत होती. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर महिन्यापासून अमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयला प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व भटक्या जमाती व इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक समाज आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया मागास घटकातील विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा लाभ मिळणार आहे

जिल्ह्यांत साडेपाच हजार विद्यार्थी

कोणाला मिळणार लाभ? शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयला प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व भटक्या जमाती व इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक समाज आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया मागास घटकातील विद्यार्थ्यांना विद्यावेतनाचा लाभ मिळणार आहे.


ITI Tuition Fee

ITI Admissions 2023 : We are going to start a career helpline soon for the students of Government Industrial Training Institute, also for all Scheduled Tribes, Freed Castes, Nomadic Tribes, Other Backward Classes, Special Backward Classes, Minorities, Open Category Economically Backward category trainees whose parents’ annual income is within the limit of 8 lakhs. Skill Development Minister Mangal Prabhat Lodha gave an answer in the Legislative Council that he will start the 500 rupees tuition fee by September 2023.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरविषयक हेल्पलाईन लवकरच सुरू करणार  आहोत, तसेच  सर्व अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील प्रशिक्षणार्थी यांना ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखाच्या मर्यादेत आहे. त्यांना ५०० रूपये विद्यावेतन सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू करणार असल्याचे उत्तर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत दिले.

या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना करिअर विषयक संधीची माहिती देण्याकरिता कायमस्वरूपी हेल्पलाईन व ईमेल सुरू करण्याबाबत विधानपरिषद सदस्य उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना मंगल प्रभात लोढा बोलत होते.

कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मेळावे राज्यात २८८ मतदारसंघातील २६० ठिकाणी शिबीर पार पडले. यामध्ये १ लाख ७४ हजार युवक युवतींनी सहभाग घेतला, यामध्ये १५ हजार ४९३ पालकांनी सहभाग घेतला. तसेच ज्या आस्थापनांमध्ये  नोकरभरती होणार आहे, त्यासाठीदेखील समन्वय साधून रोजगाराची संधी निर्माण व्हावी, यासाठी जॉब कार्डबाबतही माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल. पुणे व ठाणे येथे इंडस्ट्री मीट घेतली होती, अशी माहिती कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

या चर्चेत विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.


Maharashtra ITI Admissions 2023 @admission.dvet.gov.in

ITI Admissions 2023: The admission process in the industrial training institutes has been started from 12th June 2023 and the interested students who have passed or failed the 10th must go to the website admission.dvet.gov.in and submit the application form online till 11th July 2023. Information booklet of standardized procedure prepared for admission in industrial training institute has been made available in online form on the website.

 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया दिनांक १२ जून २०२३ पासून सुरू करण्यात आलेली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन दिनांक ११ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरात एकूण ८५ व्यवसाय उपलब्ध असून १५४९३२ एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जादा मागणीचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ६५२ नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आलेली आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआयतून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआयमध्ये प्रवेश घ्यावे, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.


DVET ITI Admissions 2023 @admission.dvet.gov.in

Admissions to government Industrial Training Institutes (ITIs) in the state will begin from Monday (June 12). The first admission list will be announced on July 20 and the admission will begin. Students can apply through the website https://admission.dvet.gov.in. – Centralized Online ITI Admission Process – 2023 केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया – 2023

यंदा आयटीआय औद्योगिक ड्रोन टेक्निशियनवर विशेष भर देण्यात येत आहे. औद्योगिक प्रशिक्षण प्रवेश 12 जूनला सुरू होणार असुन 15 जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी होणार जाहीर होणार आहे. यंदा ड्रोन टेक्निशियन , एरोनॉटिकल, कम्प्युटर प्रोग्रामिंग या विषयावर अधिक भर देण्यात येत आहे. राज्यामध्ये जून महिन्याच्या 12 तारखेपासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधले ऑनलाइन प्रवेश सुरू होणारा असून 15 जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. यंदा राज्यामध्ये दीड लाख औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठीच्या जागा आहेत. त्यासाठी लाखो विद्यार्थी आयटीआयसाठी प्रवेश करण्याची शक्याता आहे. दीड लाखापेक्षा अधिक रिक्त जागांवर प्रवेश : महाराष्ट्र मध्ये गेल्या काही वर्षात कौशल्य प्रशिक्षणाकडे अधिक भर दिला गेलेला आहे. त्यामुळेच यंदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून अनेक महत्त्वाचे तांत्रिक प्रशिक्षणाचे कोर्सेस देखील यामध्ये उपलब्ध असणार आहेत. कौशल्य प्रशिक्षण असल्याशिवाय रोजगार मिळणे, त्यात सातत्यपूर्ण टिकून राहणे हे शक्य नसते. त्यामुळेच महाराष्ट्रात 418 या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 95 हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागा आहेत. तर 574 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 59 हजार पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. अशा मिळून एकूण दीड लाखापेक्षा अधिक या रिक्त जागांवर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश होतील.

विद्यार्थ्यांना प्रवेशाचे नियोजन असे आहे : 12 जूनला याबाबत ऑनलाईन प्रवेशाची सुरुवात झाली आहे. हि प्रवेश परिक्षा 11 जुलैपर्यंत सुरू राहील. त्यानंतर 19 जूनला कागदपत्रांची पडताळणी, तपासणी सरु होऊन 11 जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना पडतळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर 19 जून ते 12 जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा किंवा नाही यासाठी मुदत दिली गेली आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी 13 जुलैला जाहीर होईल. तर गुणवत्ता यादींवर हरकत घेण्यासाठी 13 जुलै व 14 जुलै असे दोन दिवस विद्यार्थ्यांसाठी दिलेले आहे. 15 जुलै या दिवशी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. 20 जुलैला पहिल्या फेरीची निवड यादी देखील जाहीर केली जाईल. प्रवेशासाठी 21 जुलै ते एक ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत मुदत दिली जाईल. प्रवेश फेरी दुसरी तिसरी चौथी जुलै, ऑगस्टमध्ये सुरू होईल.

वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध: कम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्क टेक्न एरोनॉटिकल ट्रस्ट, स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर, ड्रोन टेक्निशियन, पेंटर जनरल मेक मेकॅनिक, ऑटो बॉडी रिपेयर मेकॅनिक, ऑटो बॉडी पेंटिंग, कंप्यूटर प्रोग्रामिंग असे एकूण 83 अभ्यासक्रम यंदा उपलब्ध आहेत. एरोनॉटिकल, कम्प्युटरची निगडित काही विषयांवर यंदा अधिक भर देण्यात आलेला आहे. कारण विद्यार्थ्यांचा कल गेल्या काही वर्षात याकडे दिसत आहे. विद्यार्थ्यांनी अधिक तपशीलवार माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी, असे अवाहन करण्यात येणार आहे.


 

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची सुरवात सोमवारपासून (१२ जून) होणार आहे. २० जुलैला प्रवेशाची पहिली यादी जाहीर होऊन प्रवेश घ्यायला सुरवात होईल. विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. आयटीआय प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक पात्रता असलेल्या १४ वर्षांवरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी पात्र असणार आहे. या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज, नोंदणी शुल्क भरणे, पसंतीच्या ‘आयटीआय’ची निवड करणे, अर्जात दुरुस्ती व हरकती नोंदविण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

राज्यातील ४१८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ९५ हजार ३८० आणि ५७४ खासगी ‘आयटीआय’मध्ये ५९ हजार १२ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश (मुलींसाठी एकूण ५३ हजार ६०० जागा राखीव) मिळणार आहे. १२ जूनपासून प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार असून १ सप्टेंबरपर्यंत प्रवेशाचे टप्पे पूर्ण होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

 

आवश्यक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, दहावीची गुणपत्रिका, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, दिव्यांग/सैन्यदल/अल्पसंख्यांक प्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, इत्यादी.

 

दहावीनंतर पुढे शिकून तर कोठे सरकारी नोकरी लागणार आहे, असा भविष्याचा विचार करून अनेकजण ‘आयटीआय’कडे वळत असल्याची वस्तुस्थिती आहे. आता अकरावीसह तंत्रनिकेतनचे (अभियांत्रिकी डिप्लोमा) देखील प्रवेश सुरु आहेत. त्यामुळे कोणत्या प्रवेशाला विद्यार्थ्यांची पसंती सर्वाधिक राहिली, विद्यार्थ्यांचा कल काय आहे हे ऑगस्टमध्ये स्पष्ट होणार आहे.

ITI Admission Schedule 2023 Timetable

ITI प्रवेशाचे वेळापत्रक 

  • ऑनलाइन अर्जाची सुरवात : १२ जून ते ११ जुलै
  • पहिल्या फेरीसाठी संस्था पसंतीक्रम : १९ जून ते १२ जुलै
  • अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : १६ जुलै
  • पहिली प्रवेश फेरी : २० जुलै
  • द्वितीय प्रवेश फेरी : ३१ जुलै
  • दुसऱ्या यादीनुसार प्रवेश : १ ते ४ ऑगस्ट
  • तिसरी प्रवेश फेरी : ९ ऑगस्ट
  • चौथी प्रवेश फेरी : २० ऑगस्ट

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून एक-दोन वर्षाचा ट्रेड (कोर्स) पूर्ण करून दहावीनंतर लगेचच खासगी नोकरीत पदार्पण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी साधारणतः: एक लाख तरुण-तरुणी ‘आयटीआय’ला प्रवेश घेतात. ‘आयटीआय’च्या माध्यमातून एकूण ८२ प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामध्ये फिटर व इलेक्ट्रिशन या दोन कोर्सला सर्वाधिक मागणी असून दरवर्षी त्या ट्रेडचे १०० टक्के प्रवेश हाऊसफुल होतात.

 

Admission Link


 

ITI Admissions 2023 : The latest update for failed ITI students. Opportunity For Failed Students In Industrial Training Institute. The Annual Supplementary Examination will be conducted through Computer Based Test (CBT) mode. The list of eligible students for the examination will be published on the website of the National Council of Education Research and Training by November 10. Hall tickets will be available between 25th to 25th of November 2022. Further detail are as follows:-

Opportunity For Failed ITI Students

वार्षिक पुरवणी परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाइटवर १० नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रवेशपत्र २० ते २५ नोव्हेंबर या काळात उपलब्ध होणार आहेत. अधिक माहिती https://ncvtmis.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) २०१४ ते २०२१ या प्रवेश सत्रात प्रवेश घेतलेल्या मात्र परीक्षांमध्ये अनुतीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रशिक्षण महासंचालनालयामार्फत अखिल भारतीय व्यवसाय सत्र व वार्षिक पुरवणी परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
  • त्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी १० नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
  • वार्षिक पुरवणी परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेतली जाणार आहे.
  • परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाइटवर १० नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
  • प्रवेशपत्र २० ते २५ नोव्हेंबर या काळात उपलब्ध होणार आहेत.
  • अधिक माहिती https://ncvtmis.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिकाधिक प्रशिक्षणार्थ्यांनी वार्षिक पुरवणी परीक्षेत सहभागी व्हावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.

 

‘आयटीआय’साठी अखेरची संधी

राज्यभरातील खासगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींच्या अध्ययनास महिना उलटला आहे. मात्र, अजूनही रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. नवी दिल्ली येथील प्रशिक्षण महासंचालनालयाच्या (डीजीटी) आदेशानुसार ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

  • ‘डीजीटी’च्या निर्देशानुसार, देशभरातील सर्व राज्यांमध्ये ‘आयटीआय’ची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.
  • महाराष्ट्रातील सुमारे दीड लाख जागांसाठी १५ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
  • दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण उमेदवारांसाठी राज्य परीक्षा मंडळाकडून पुरवणी परीक्षा घेण्यात आली.
  • यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही आयटीआयमध्ये प्रवेशाची संधी मिळावी, या उद्देशाने राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) पुरवणी प्रवेश वेळापत्रकही जाहीर केले.

 

Maha ITI App For DVET ITI Admission 2022

DVET ITI published a MahaITI App on Google Play store for tracking your Admission Status & Application process. You can Download this App For Applying the DVET ITI Admission 2022.  Candidates who have registered themselves for admissions on Admission Portal via http://admission.dvet.gov.in can access their Admission Status, Submit Option Form, Search ITI, Check Merit Number, Check Allocation, Download Application Form, Allotment Letter and Admission Confirmation Slip and many other features.

List of Required Documents For Admission

The applicants have to carry all these required documents and certificates at the time of admission.

  • Seat allotment letter.
  • Birth certificate.
  • SSC (Class X) mark sheet and certificate.
  • HSC certificate.
  • Domicile certificate.
  • Caste or category certificate.
  • School leaving certificate.
  • Two passport size photographs (must be recent).
  • Address proof.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

21 Comments
  1. Shailesh ghatal says

    आयटीई साठी कागद पत्रे कोण कोणती लागतील

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड