Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

डिप्लोमा प्रवेश अर्जांना १३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Diploma Admission Application Process Extended Again

Diploma Admission Application Process Extended Again : डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांना आतापर्यंत तब्बल पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे, तरीही अवघे ७५ हजार ६० विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.

Diploma Admission Application Process Extended Again : तंत्रशिक्षण संचालनालयाकडून दहावी आणि बारावी नंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे; तसेच अर्जाची पडताळणी करण्याची मुदत पुन्हा १३ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. साधारण १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेला आता सहाव्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावीनंतरच्या डिप्लोमासाठी ६ ऑक्टोबरपर्यंत ७५ हजार ६० विद्यार्थ्यांनीच आपले अर्ज भरून पूर्ण केले आहेत.

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) दहावीनंतरच्या इंजिनीअरिंग डिप्लोमा (पॉलिटेक्निक); तसेच बारावीनंतरच्या फार्मसी, सरफेस कोटींग टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अशा डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया १० ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. या दोन्ही डिप्लोमा प्रवेशाला येत्या १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यासाठी सहाव्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, तात्पुरती गुणवत्ता यादी १६ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून, त्याबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी १७ ते १९ ऑक्टोबर अशी मुदत दिली आहे. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे, अशी माहिती डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली आहे. याबाबतची अधिक माहिती www.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड