Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महत्त्वाचे – महसूल विभागात विविध जागांची ३१ पदे रिक्त !! | Mahsul Vibhag Bharti 2024

Department of Revenue Bharti 2024

Mahsul Vibhag Bharti 2024

Department of Revenue Bharti 2024: There are 81 villages in Mangalvedha revenue division. For these 81 villages, 46 Talathi seats are approved. Out of them 33 seats are vacant while 13 seats are vacant. As a basic element of the government at the village level, the government gives various circulars, government decisions, standing orders or instructions to Talatha with the tasks of keeping the registers of the rural area up to date, monitoring the daily activities, working as a link between the government and the people by knowing the problems of the villagers. Due to vacancies in the revenue department, citizens’ work is not done on time. Ten helpatas have to be killed for one job. Due to this, the citizens have to bear mental anguish. The citizens are demanding that the recruitment of revenue administration employees who bear the burden of the agricultural cycle of the taluka should be done as soon as possible.

तहसीलदार हा तालुका महसूल प्रशासन व्यवस्थेचा केंद्रबिंदू असतो. महसूल विभागात जमिनीशी संबंधित कामे, करसंबंधित कामे, समस्यांचे निवारण, नैसर्गिक आपत्तीशी संबंधित नुकसान, दस्तऐवज संबंधित कामे, भूसंपादन प्रकरणे आदी विविध प्रकारची कामे असतात. महसूल विभागातील रिक्त पदांमुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. एका कामासाठी दहा हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्याच्या शेती चक्राचा बोजा वाहणाऱ्या महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांची भरती लवकरात लवकर व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

????तलाठी भरती २०२३ सर्व जिल्ह्यांच्या नवीन निवड याद्या जाहीर, आपला निकाल पहा! -Talathi Bharti Result 2023, Cut off Marks and Merit List

तलाठ्यांच्या रिक्त जागा अधिक

मंगळवेढा महसूल विभागात ८१ गावे आहेत. या ८१ गावांसाठी तलाठ्यांच्या ४६ जागा मंजूर आहेत. त्यापैकी ३३ जागांवर तलाठी आहेत तर १३ जागांवर पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व जनता यांमधील दुव्याचे काम करणे या कामांसह शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश किंवा सूचना देत असते.

नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडल अधिकारी व तहसीलदारास देणे, गावातील जमिनींचा आणि पिकांचा हिशेब ठेवणारा हिशेबनीस म्हणून तलाठ्याकडे पाहिले जाते. गावातील इंचन्इंच जमिनीच्या तसेच जलस्रोतांच्या नोंदी ठेवणे हे तलाठीपदाचे मुख्य काम आहे.
पण तलाठी पदांच्या अपुऱ्या संख्येमुळे कामावर असणाऱ्या तलाठ्यांवर त्या अतिरिक्त कामांचा ताण येतोय व त्याचा परिणाम कामावर दिसून येत आहे.

अशा आहेत रिक्त जागा

  • नायब तहसीलदार : एक
  • अकाउंटंट : एक
  • महसूल सहायक : सहा
  • तलाठी : १३
  • वाहनचालक : एक
  • शिपाई : पाच
  • कोतवाल : चार

अशा एकूण १३० मंजूर पदांपैकी ३१ कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया अपुरी आहे.


Mahsul Vibhag Bharti 2023

Department of Revenue Bharti 2023: The latest update for Mahsul Vibhag Recruitment 2023. As per the latest news, There are a total of 13000+ posts vacant in the Department of Revenue. The last recruitment was conducted in few years ago for Clerk posts. The last six years have not been filled. Further details are as follows:-

राज्यातील महसूल विभागातील तब्बल १३ हजार ५३६ पदे रिक्त असून यामुळे सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या कामाचा खोळंबा होत आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांमधील या रिक्त पदांमुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एखाद्या कामासाठी सर्वसामान्यांना वारंवार महसूल कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र राज्यात आहे. शेतकऱ्यांचा वारंवार संपर्क येणाऱ्या तलाठ्यांची महसूल विभागात सर्वाधिक रिक्त पदे असून हा आकडा ५ हजार ३० इतका आहे. तहसीलदार ६६ पदे, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची ५२३ पदे रिक्त आहेत. महसूल विभागातील या रिक्त पदांमुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक कामांची जबाबदारी येऊन पडत आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार आहे. त्यामुळे त्यांच्याकडील कामेही प्रलंबित राहत आहेत. त्यात नैसर्गिक आपत्ती आली की पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात महसूल यंत्रणा गुंतते आणि मग प्रलंबित कामाचा ढीग वाढतच जातो.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महसूल विभागात तलाठी भरती जाहिरात आज आली – Talathi Bharti 2023


 

– महसूल विभागाने २९ नोव्हेंबर रोजी पत्र काढून तलाठी संवर्गातील ४,१२२ पदांची भरती करण्यास मान्यता दिली आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर अशा सर्व महसूल विभागातील ही रिक्त पदे एकाच वेळी भरण्यात येणार आहेत.

– मात्र यासंदर्भात घोषणेपलीकडे काहीही झाले नसून तलाठी
भरतीसंदर्भात अद्याप जाहिरातही प्रसिद्ध झालेली नाही. सध्या रिक्त पदांचा भार इतर तलाठ्यांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपातळीवरील
सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या विविध कामांना विलंब होत आहे.

 

सर्वाधिक रिक्त पदे तलाठ्यांची…
=>अपर जिल्हाधिकारी –     ३१
=>उपजिल्हाधिकारी –     १६
=>तहसीलदार –     ६६
=>नायब तहसीलदार –     ४५७
=>तलाठी –     ५,०३० 
=>अधीक्षक –     १२
=>उपअधीक्षक भूमी अभिलेख –     ९१
=>मुद्रांक निरीक्षक –     १५
=>दुय्यम निबंधक –     १८२
=>मंडल अधिकारी, अव्वल
कारकून, महसूल सहायक,
लघुटंकलेखक –     २,५७५
=>अराजपत्रित लघुलेखक –     १५३
=>कनिष्ठ लिपिक –     ५३२
=>पदसमूह ४ –     १,८१९
=>शिपाई –     २,३७५

 

Mahsul Vibhag Bharti 2023 Updates Posts

 

 

 


Department of Revenue Bharti 2023

  • या रिक्त पदांमुळे पालघर जिल्ह्याचा विकास खुंटत चालला असल्याचे सांगितले जात आहे.
  • महसूल विभागअंतर्गत तहसीलदार कार्यालय, उपविभागीय कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांमध्ये सरळ सेवेच्या मंजूर पदांपैकी विविध पदे भरली गेलेली नाहीत.
  • २०१५-१६ मध्ये लिपिक पदाची शेवटची पदे भरली गेली.
  • त्यानंतर तलाठी भरतीची प्रक्रिया पूर्ण केली. मात्र न्यायालयाच्या नोकरभरती आरक्षणबाबतच्या स्थगितीमुळे ती थांबली.
  • त्यानंतर आतापर्यंत अनेक पदे रिक्त आहेत.
  • जिल्हाधिकारी कार्यालयात गट अ, ब, क व ड वर्गातील अनेक पदे रिक्त आहेत.
  • यात काही ठिकाणी ५० टक्क्यांहून अधिक रिक्त पदे दिसत आहेत.
  • त्यातच अलीकडील काळात शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील २९ शिपायांची पदे निर्लेखित करण्यात आली.
  • शासकीय सेवेत घेण्यापेक्षा ही पदे कंत्राटी सेवेतून भरण्याच्या सूचना दिल्यामुळे ही पदे कमी झाली आहेत.
  • गट ड वर्गाच्या कर्मचारी कमतरतेमुळे कार्यालयीन कामे करण्यात अडचणी येत आहेत.
  • इतर कर्मचारी वर्गावर ही जबाबदारी सोपवली असल्याने त्यांच्यावरही कामाचा अतिरिक्त भार व तणाव दिसून येत आहे.

Mahsul Vibhag Recruitment 2023 

तहसीलदार कार्यालयांमध्ये असलेल्या १३ ते १४ पदाच्या प्रवर्गापैकी सर्वाधिक पदे तलाठी संवर्गाची रिक्त आहेत. त्याखालोखाल लिपिक-टंकलेखक यांची पदेही रिक्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे कामे होण्यास उशीर झाल्यामुळे नागरिकांचा रोष अधिकारी- कर्मचारी वर्गाला ओढावून घ्यावा लागत आहे. उपविभागीय कार्यालयातही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशीच काहीशी स्थिती आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय, तहसीलदार व मंडळ अधिकारी अशा महसूल विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर दोन ते तीन पदांचा अतिरिक्त पदभार दिल्यामुळे या कामांचा डोंगर वाढतच जात आहे. काही अधिकारी- कर्मचारी अशा अतिरिक्त कामामुळे मानसिक तणावाखाली असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. या प्रश्नाकडे जातीने लक्ष देऊ पदभरती करावी अशी मागणी यानिमित्ताने अधिकारी- कर्मचारी वर्गाकडून समोर येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून महसूल विभागातील विविध विभागांमध्ये कर्मचारी कमतरतेमुळे कामांचे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. कर्मचारी वर्गावर कामाचा मोठा तणाव आहे. उपविभागीय व तहसीलदार कार्यालयांमध्ये नागरिकांचे काम न झाल्याने कर्मचाऱ्यांना रोष ओढवून घ्यावा लागत आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही भरती स्थगित आहे. – संजय लाडे, अव्वल कारकून, आस्थापना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय


Mahsul Vibhag Bharti 2023

 

Department of Revenue Bharti 2022: महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यात यावी तसेच कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी व जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात यावी याकरिता उपविभागीय कार्यालयातील व तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी 4 एप्रिलपासून तहसील कार्यालयापुढे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

Maharashtra Revenue Department Bharti 2022

Department of Revenue Bharti 2022


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

11 Comments
  1. MahaBharti says

    New Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड