शिष्यवृत्ती अर्ज सादरीकरणासाठी महाविद्यालयांना २० फेब्रुवारीपर्यंत मुदत!

Deadline for colleges to submit scholarship application by February 1!

शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क , परीक्षा शुल्क योजनेचे अर्ज आॅनलाईन पद्धतीने सादरीकरणासाठी महाविद्यालयांना २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महाविद्यालयांना महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करावे लागणार आहेत.

शैक्षणिक सत्र २०१९-२० साठी महाडीबीटी प्रणालीवर अनुजाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुक्ल, परीक्षा शुक्ल योजनेचे अनेक अर्ज अद्यापही महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. महाविद्यालयांनी हे प्रलंबित अर्ज जिल्हा लॉगीनवर सादर करण्यासाठी २२ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली असून, अनेक महाविद्यालयांनी आॅनलाइन अर्ज सादर केली नाहीत. त्यामुळे समाजकल्याण कार्यालयाकडून २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संधीचा लाभ जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांनी घेऊन प्रलंबित अर्ज दिलेल्या मुदतीत शासन निर्णयानुसार पडताळणी करून जिल्हा कार्यालयाकडे पाठवावेत, दिलेल्या मुदतीत महाविद्यालयांनी प्रलंबित अर्ज जिल्हा कार्यालयाकडे सादर न केल्यास विद्यार्थी योजनेपासून वंचित राहतील. यासाठी महाविद्यालय जबाबदार राहणार असल्याने महाविद्यालयांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याणतर्फे करण्यात आले.

सोर्स : लोकमत


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Somnath says

    Army Bharti aapadat pathva

  2. Somnath says

    Army Bharti mylava kadi aahi

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप