Coronavirus : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या भरती परीक्षा पुढे ढकलल्या

Coronavirus : SSC Bharti Exam postponed

स्टाफ सिलेक्शन कमिशनने गुरूवारी आपल्या भरती परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली. कोरोना व्हायरसच्या संसर्गाची सध्याची स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
देशात कोविड-19 मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन तसेच कमिशनने व्यापक जनहित लक्षात घेऊन 20 मार्चपासून होणार्‍या संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तरीय परीक्षा ((Tier-I)) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचप्रमाणे, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मॅकेनिकल आणि क्वॉन्टीटी सर्व्हिंग आणि कॉन्ट्रॅक्ट) (पेपर-I) 2019 परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यात आली असल्याचे एसएससीने म्हटले आहे. या परीक्षांचे नवीन वेळापत्रक लवकरच येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येईल.
उमेदवारांना सल्ला देण्यात येत आहे की, त्यांनी कमिशनच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देऊन माहिती घेत राहावे, असे एसएससीने म्हटले आहे.

सौर्स : पोलिसनामा

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप