करोना: वायुसैनिकांची ऑनलाइन परीक्षा लांबणीवर

Corona Virus Air Force Online Exam Postpone

केंद्रीय वायूसैनिक भरती मंडळ (Central Airmen Selection Board) ने वायूसैनिकांची ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलली. करोना विषाणूच्या देशातील फैलावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे बोर्डाने कळवले आहे.

देशभरातील ८६ शहरात १९ ते २३ मार्च दरम्यान ही परीक्षा होणार होती. आता ही परीक्षा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात होऊ शकेल, असे हवाईदल जनसंपर्क विभागाने कळवले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी www.airmenselection.cdac.in या संकेतस्थळावर संपर्क साधता येईल.

सेंट्रल एअरमेन सिलेक्शन बोर्डाने परिपत्रकात असे म्हटले आहे की करोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर STAR 01/20 ऑटोमेटेड ई-परीक्षा अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा १९ ते २३ मार्च २०२० या दरम्यान होणार होती. मात्र अनेक राज्य सरकारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कलम १४४ लागू केले आहे. ही परीक्षा एप्रिल २०२० च्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाऊ शकते.’

सोर्स : Maharashtra Times


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप