१ली ते ८वी परीक्षा रद्द -कोरोना अपडेट

class-first-eight-exam-cancelled-by-Maharashtra-government

करोनाच्या प्रसाराची भीती अजून कायम असल्यानं राज्य सरकारनं शालेय शिक्षणाबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाची बैठक बोलावली होती. या बैठकीत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर इयत्ता नववी ते ११ची परीक्षा एप्रिलनंतर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

करोनाचा प्रसार होत असल्यानं राज्यातील परिस्थिती संवेदनशील होत चालली आहे. पुणे, मुंबईसह अनेक शहरात नागरिक बाहेर जाण्याचं टाळत आहे. राज्य सरकारकडून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, प्रवास टाळावा, तसेच स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे.

गेल्या आठवड्यात करोना बाधित रुग्णांचा आकडा वाढल्यानं सरकारनं शाळा महाविद्यालये बंद करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर लोकांची गर्दी होणारी ठिकाणही बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते. करोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. त्यामुळे शालेय परीक्षा कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यासंदर्भात अखेर सरकारनं निर्णय घेतला आहे.

class-first-eight-exam-cancelled-by-Maharashtra-government


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Usha rameah Nawale says

    शिक्षक भरती कधी निघनार आहे आणि टेट च रिझलट कधी लागणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप