Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

CBSE १० वी, १२ वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

CBSE Exam Timetable 2020 Details

सीबीएसईने दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षा १ ते १५ जुलै २०२० दरम्यान होणार आहेत. कोणता पेपर कधी, कोणत्या सत्रात याविषयीची सविस्तर माहिती बोर्डाने दिली आहे. शिवाय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनीही हे टाइमटेबल ट्विट केले आहे.

दहावी आणि बारावीच्या एकूण २९ विषयांच्या परीक्षा होणार आहेत. कोणत्या परीक्षा पूर्ण देशभर होणार आहेत आणि कोणत्या केवळ ईशान्य दिल्लीत होणार आहेत, ते या वेळापत्रकात सविस्तरपणे नमूद करण्यात आले आहे. सर्व परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत होणार आहेत.

कोविड-१९ महामारी संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने विशेष सूचना जारी केल्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:ची सॅनिटायझरची बॉटल सोबत आणायची आहे. ही बॉटल पारदर्शक असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर येताना नाक, तोंड झाकणे बंधनकारक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम काटेकोररित्या पाळणे अत्यावश्यक आहे, असे बोर्डाने कळवले आहे. पालकांनी त्यांचे पाल्य आजारी नाही ना याची शहानिशा करणेदेखी आवश्यक असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.

CBSE SSC Timetable Page 1
CBSE १० वीचे वेळापत्रक

 

CBSE 12th Timetable 2020 Page 1


 

१७ मे २०२० अपडेट – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) दहावी व बारावीच्या उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक सोमवारी १८ मे २०२० रोजी जाहीर करणार आहे. यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ.रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली आहे.

“#CBSE is taking into consideration some additional technical aspects before finalising the datesheets of the board exams of classes 10th and 12th, due to which, the date sheets will now be released by Monday i.e. 18-05-2020. Inconvenience caused is sincerely regretted,” HRD minister tweeted.

केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की ‘करोना व्हायरस कोविड -१९ च्या संकटामुळे सीबीएसईच्या उर्वरित परीक्षांबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.

केंद्रीय मंत्री निशंक पोखरियाल ने शनिवार को ही डेटशीट जारी करने वाले थे लेकिन किसी वजह से नहीं की। उन्होंने ट्विटर पर बताया कि अब डेटशीट सोमवार तक जारी की जाएगी। हालांकि इस बात की जानकारी पहले ही दे दी गई है कि एग्जाम कब से कब तक होंगे। सीबीएसई बोर्ड 10वीं और 12वीं के बचे हुए एग्जाम 1 से 15 जुलाई तक होंगे। अब सिर्फ यही घोषणा होना बाकी है कि किस सब्जेक्ट का एग्जाम कब होगा।

CBSE Exam Timetable 2020

आज ही अनिश्चितता दूर करून विद्यार्थ्यांची उत्सुकता पाहता आम्ही इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तारीख संध्याकाळी ५ वाजता जाहीर करीत आहोत.’ या ट्विटसह केंद्रीय मंत्र्यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना आज १६ मे २०२० रोजी संध्याकाळी ५ वाजता ट्विटरवर सीबीएसईच्या परीक्षांसंदर्भातील माहितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. परंतु आता प्राप्त बातमी नुसार हा निकाल आता सोमवारी प्रकाशित होणार आहे.

काही दिवसांपूर्वी सीबीएसईने जाहीर केले होते की दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा १ ते १५ जुलै २०२० दरम्यान घेण्यात येतील. दहावीची परीक्षा फक्त ईशान्य दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी असेल तर १२ वी च्या उर्वरित परीक्षा देशभरात घेण्यात येणार आहेत.

लॉकडाऊनमुळे वेळेचा अभाव असल्याने केवळ प्रमुख २९ विषयांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड