CBSE परीक्षांबाबत करोना अपडेट

देशभरात करोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. आतापर्यंत १७ मार्चपर्यंत देशभरात १२५ जणांना करोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. बहुतांश सर्व राज्यांनी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा सुरूच आहेत. विद्यार्थी-पालकांकडून परीक्षा रद्द करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने ट्विटरवरून स्पष्टीकरण दिले आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने परीक्षा स्थगित केलेली नाही. मात्र काही विद्यार्थी आणि पालकांनी ही परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली आहे. पण सीबीएसईने स्पष्टीकरण दिले आहे. ‘बोर्ड परीक्षा धोरणांच्या आधारे सक्षम अधिकाऱ्यांमार्फत घेतल्या जातात. हे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. संसर्ग टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.’

दिल्लीच्या ईशान्य भागातील परीक्षाही हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यादेखील या दरम्यान होणार होत्या पण आता या परीक्षा १४ एप्रिलला संपणार आहेत.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप