महिला अत्याचार विरोधात तपास करणाऱ्या CAW शाखेत ६२ टक्के पदे रिक्त – CAW Bharti 2024
CAW Bharti 2024
महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या तपास करणाऱ्या महिला अत्याचार विरोधी शाखा (सीएडब्ल्यू) विभागात ६२ टक्के पदे रिक्त आहेत. गंभीर बाब म्हणजे येथील मंजूर उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त दोन्ही पदे रिक्त आहेत. याशिवाय पोलीस निरीक्षकाच्या दोन मंजूर पदांपैकी एक पद रिक्त आहे. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्ष पदाच्या १२ मंजूर जागांपैकी ८ पदे रिक्त आहेत. तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांपैकी पोलीस हवालदार, पोलीस शिपाई यांच्या ६१ मंजूर पदापैकी ३७ पदे रिक्त आहेत.
यंग व्हिसलब्लोअर फाउंडेशनचे जितेंद्र घाडगे यांना माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती प्राप्त झाली आहे. महिलांविरोधातील अत्याचाराबाबतच्या गंभीर घटनांचा लवकर तपास व्हावा यासाठी विशेष कक्ष असावा या उद्देशाने सीएडब्ल्यूची स्थापना करण्यात आली होती. पण आता या विभागात गुन्ह्यांचा तपास होत नाही. टपाल विभागाप्रमाणे त्यांना प्राप्त तक्रारी विविध पोलीस ठाण्याकडे चौकशीसाठी पाठवल्या जातात. जानेवारी २०२० ते एप्रिल २०२४ या कालावधीत सीएडब्ल्यूच्या कक्ष १ ला बलात्कार, अपहरण व विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांच्या २३० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील ५० प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आली आहे. उर्वरित १४४ तक्रारी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्या आहेत, तर ४ चौकश्या प्रलंबित आहेत. कौटुंबिक हिंसाचार, हुंडा बळी, खून, आत्महत्या व इतर तक्रारींचा तपास सुरू आहे. याशिवाय कक्ष – २ ला जानेवारी २०२० ते एप्रिल २०२४ या कालवधीत १६८८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी २७३ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. त्यातील ३०७ प्रकरणांचा तपास बंद करण्यात आला आहे. तर १०७७ प्रकरणे पुढील चौकशीसाठी स्थानिक पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत. तर ३१ प्रकरणे प्रलंबीत आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.