बार्टीच्या माध्यमातून 3 लाख विद्यार्थ्यांना रोजगार देणार

BARTI employ 3 lacs students

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) तसेच अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तीन लाख विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण तसेच रोजगाराचा हक्क देण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी येथे दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडलेल्या बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी बोलताना मुंडे यांनी विद्यार्थी करिअरच्यादृष्टीने परिपूर्ण व्हावा यासाठी बार्टीच्या माध्यमातून विविध प्रिशक्षण कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

युपीएससी, एमपीएससी, एमबीए, बॅंकिंग, रेल्वे, पोलीस, सैन्य दलातील विविध विभाग यांना अनुसरून विशेष अभ्यासक्रम निश्‍चित करण्यात येतील. याशिवाय उद्योगांच्या निकडीनुसार कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी शेतीविषयक प्रशिक्षण योजना राबविणार असल्याचे मुंडे म्हणाले.
जपानमध्ये जपानी भाषा बोलणा-या विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विभागामार्फत जपानी भाषा शिकविणारे विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू करून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात हक्काची नोकरी मिळवून देण्याचा विभागाचा मानस असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

सौर्स : प्रभात

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप