अनेक शाळा होणार बंद !!

Various Schools will be closed

मागील दहा वर्षांपासून राज्यात शिक्षक भरतीला लागलेले ग्रहण आजही कायम आहे. सध्याच्या शैक्षणिक वातावरणात डीएडकडे विद्यार्थ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवल्याचे वातावरण आहे. महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली मारामार लक्षात घेऊन जिल्ह्यातील तब्बल नऊ महाविद्यालये पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी ओस पडली आहेत. तसेच विनाअनुदान तत्त्वावर ही महाविद्यालये चालविणे अशक्‍य असल्याने ती आता कायमची बंद करण्याचा निर्णय संस्थाचलकांनी घेतला आहे.

आठ वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यात डीएडची 90 पेक्षा जास्त अध्यापक महाविद्यालये होती. मात्र, शासनातर्फे शिक्षक भरतीच होत नसल्याने मुलांचा या क्षेत्राकडे जाण्याचा कल हळूहळू कमी झाला. परिणामी, दरवर्षी विद्यार्थी संख्येअभावी चार-पाच महाविद्यालये बंद पडत गेली. मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील 50 महाविद्यालये विद्यार्थी संख्येअभावी बंद पडली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 41 डीएडचे महाविद्यालये सुरू होती. विद्यार्थीच मिळत नसल्याने 2019-20 या सत्रात जिल्ह्यातील नऊ महाविद्यालये पुन्हा बंद पडली. 32 विद्यालये अद्याप सरू आहेत. परंतु या 32 अध्यापक महाविद्यालयांत अगदी नगण्य विद्यार्थी संख्या आहे. जवळपास सर्वच अध्यापक महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची पटसंख्या दहाच्या खालीच असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. नव्या विद्यार्थ्यांनी डीएडच्या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवल्याने महाविद्यालयांना टाळे लावण्याची वेळ आली आहे. शिक्षक भरती होतच नसल्याने या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत.


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !