Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

खुशखबर !! अमरावती महानगरपालिका अंतर्गत एकूण २०८७ पदांसाठी आकृतीबंधास मान्यता | Amravati Mahanagarpalika Bharti 2024

Amravati Mahanagarpalika Bharti 2024

Amravati Mahanagarpalika Bharti 2024

Amravati Mahanagarpalika Bharti 2024: Good news!! The scheme has been approved for a total of 2087 posts under Amravati Municipal Corporation. Through this recruitment, a total of 41 departments will be recruited for various posts. Below is the combined figure of 2087 posts for Amravati Municipal Corporation in various cadres from class-1 to class-4 as well as department wise. Know More details about Amravati Mahanagarpalika Bharti 2024, Amravati Mahanagarpalika Recruitment 2024 at below:

खुशखबर !! अमरावती महानगरपालिका अंतर्गत एकूण २०८७ पदांसाठी आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे. या भरती द्वारे एकूण ४१  विभागातील विभिन्न पदांवर भरती करण्यात येणार आहे. अमरावती महानगरपालिकेकरीता विविध संवर्गातील वर्ग-१ ते वर्ग-४ मधील तसेच विभागनिहाय २०८७ पदांचा एकत्रित आकृतीबंध खाली दिलेला आहे. उमेदवार खालील लिंकद्वारे आकृतीबंध PDF डाउनलोड करू शकता तसेच या भरतीशी संबंधित सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

A consolidated figure for the Amravati Municipal Corporation was not yet decided. Considering the expansion of the city, increasing urbanization and insufficient officers/employees in the municipal corporation, difficulties are arising in carrying out the government’s plans and office work within a fixed period of time. Therefore, it is necessary to determine the structure and fill the necessary posts for Amravati Municipal Corporation.

अमरावती महानगरपालिका प्रशासकीय ठराव क्र. १५३/२०२४, दि.१२.०१.२०२४ अन्वये मान्यता प्राप्त तसेच, आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका यांनी दि.१२.०१.२०२४ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त प्रस्तावानुसार, यापूर्वी ४१ विभागांतील काही संवर्गातील शासन निर्णयांद्वारे व ठरावांद्वारे मान्यता प्राप्त २४५७ पदांपैकी ६५० पदे व्यपगत केल्याने, तसेच २८० पदांची निर्मिती केल्याने होणाऱ्या एकूण २०८७ पदांच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

अमरावती महानगरपालिका प्रशासकीय ठराव क्र. १५३/२०२४, दि.१२.०१.२०२४, तसेच आयुक्त तथा प्रशासक, अमरावती महानगरपालिका यांनी दि.१२.०१.२०२४ रोजीच्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ५१ (४) नुसार शासनास असलेल्या अधिकाराचा वापर करुन यासोबतच्या प्रपत्र-ब व ई मध्ये नमूद पदांच्या गोषवाऱ्यानुसार अमरावती महानगरपालिकेकरीता विविध संवर्गातील वर्ग-१ ते वर्ग-४ मधील तसेच विभागनिहाय २०८७ पदांचा एकत्रित आकृतीबंध व प्रपत्र अ, आ, क, ड व इ यांना परिच्छेद क्रमांक ५ मध्ये नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे.
२. सोबत जोडलेल्या प्रपत्र अ, आ, ब, क, ड, इव ई चे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे:-
अ) यापूर्वी अमरावती महानगरपालिकेकरीता शासनाने वेळोवेळी शासन निर्णयांद्वारे मंजूर केलेल्या ५८ पदांचे विवरण प्रपत्र- अ नुसार, तसेच अमरावती महानगरपालिकेने विविध ठरावांन्वये मंजूर केलेल्या २३९८ पदांचे विवरण प्रपत्र- आ नुसार दर्शविण्यात आले आहे.
ब) सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र-ब मधील स्तंभ क्र. (६) मध्ये नमूद करण्यात आलेली २८० नवीन पदे निर्माण करण्यास व प्रपत्र- इ मध्ये नमूद केल्यानुसार एकूण ६५० पदे व्यपगत करण्यात येत आहेत.

Download Amravati Mahanagarpalika Bharti 2024 PDF 

Amravati Mahanagarpalika Bharti 2024: amtcorp (Amravati Municipal Corporation) has declared a new recruitment notification for the various vacant posts of “Staff Nurse MPW”. Contract posts under Amravati Municipal Corporation under National Health Mission Amravati are to be filled through recruitment. For this the interested candidates need educational as per attached application form. There are a total of 35 vacancies are available to fill the posts. The applications should be in a sealed envelope, and the envelope should be superseded “National Urban Health Mission under 15th Finance Commission – Application for this post”. After scrutiny of the application for any post, the detailed details regarding the received/unreceived list of candidates etc. will be published from time to time on Amravati Corporation website . The last date for sending application is 09th November 2023. The official website for Amravati Municipal Corporation is hwww.amtcorp.org. More details are as follows:-

अमरावती महानगरपालिका, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत “स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू” पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –  स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू
  • पदसंख्या – 35 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअमरावती
  • वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • अर्ज सादर करण्याचे स्थळ – महानगरपालिका अमरावती, सावर्जनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.amtcorp.org

Amravati Mahanagarpalika Vacancy 2023

 

पदाचे नाव पद संख्या 
स्टाफ नर्स 18 पदे
एमपीडब्ल्यू 17 पदे

Educational Qualification For Amravati Mahanagarpalika Recruitment 2023

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
स्टाफ नर्स GNM/BSC Nursing with valid registration
एमपीडब्ल्यू 12th Pass in Science +Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course

Salary Details For Amravati Municipal Corporation Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
स्टाफ नर्स 20,000/-
एमपीडब्ल्यू 18,000/-

Amravati Municipal Corporation Recruitment 2023 – Important Documents 

  • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका 
  • राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा जन्म तारखेचा दाखला
  • प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • शासकीय अनुभव असल्यास अनुभव दाखला
  • नावात बदल असल्यास गॅजेट (राजपत्र) जोडणे

How To Apply For Amravati Mahanagarpalika Jobs 2023

  • जाहिरात ऑनलाईन व वृत्तपत्रातुन प्रसिध्द केले जाईल.
  • तसेच अमरावतीचे वेबसाईट www.amravaticorporation.in वर जाहिरात उपलब्ध राहील.
  • प्रत्यक्ष अर्जाची प्रत कार्यालयात आणुन दयावे. तसेच जिल्हयाबाहेरील असलेले उमेदवारांनी अर्ज पोस्टब्दारे या कार्यालयात पाठवावे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग ( आवक-जावक कक्ष, शेवटची खोली), पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती. पिन कोड 444601 येथे आणुन दयावा. अर्ज हे जाहीरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासुन 03/11/2023 ते 09/11 / 2023 कार्यालयीन वेळेत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आणुन दयावे.
  • अर्ज बंद पाकीट मध्ये असावेत, तसेच पाकीटवर “राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान 15 वा वित्त आयोगा अंतर्गत – या पदाकारीता अर्ज असे नमुद करावेत”. कुठल्या पदाकरीता तदनंतर अर्जाची छाननी करून उमेदवारांची प्राप्त / अप्राप्त् यादी इत्यादी बाबत सविस्तर तपशिल वेळोवेळी अमरावती महानगरपालिका वेबसाईटवर www.amravaticorporation.in प्रसिध्द करणेत येईल. तसेच इतर कोणत्याही पध्दतीचा अवलंब करणेत येवू नये याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. याबाबत पुनश्च वर्तमानपत्रामध्ये जाहीरात दिली जाणार नाही.
  • उमेदवारांनी वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी अमरावती महानगरपालिका वेबसाईटवर प्रसिध्द करणेत येतील.
  • आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित झाल्यावरच नियुक्ती आदेश देण्यात येतील..

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.amtcorp.org Recruitment 2023

📑 PDF जाहिरात II https://shorturl.at/iALUW
✅ अधिकृत वेबसाईट
www.amtcorp.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड