Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ऑल इंडिया बार परीक्षा पुन्हा लांबणीवर

All India Bar Examination 2020

All India Bar Examination 2020 : ऑल इंडिया बार परीक्षा (All India Bar Examination) पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही परीक्षा १६ ऑगस्ट २०२० रोजी होणार होती.

All India Bar Examination 2020 : कोविड-१९ विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया बार परीक्षा (All India Bar Examination) पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही परीक्षा १६ ऑगस्ट २०२० रोजी होणार होती. बार काउन्सिल ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला आहे. एआयबीई परीक्षा ही त्या फ्रेशर वकिलांसाठी आयोजित करण्यात येते ज्यांना वकालत करायची असते. सनद मिळवण्यासाठी ही परीक्षा बंधनकारक असते.

All India Bar Examination 2020.jpg

ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होते. देशभरात तब्बल ११ विविध भाषांमध्ये या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी मार्च आणि डिसेंबर अशी दोन वेळा ही परीक्षा आयोजित केली जाते. मार्चची परीक्षा करोनामुळे ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आता पुन्हा उमेदवारांना पुढील तारखेची वाट पाहावी लागेल.

बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या २९ जुलै रोजी झालेल्या बैठकीत हा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिवाय या परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत ३१ ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचा प्रस्तावही या बैठकीत पारित करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी ही परीक्षा १५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती आणि निकाल २२ नोव्हेंबरला लागला होता. ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. लॉचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या नामांकनाच्या दोन वर्षांच्या आत ही परीक्षा पास व्हावी लागते. त्यानंतरच बार काउन्सिल ऑफ इंडिया ‘सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस’ देतं.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. C R Manglekar says

    whether jobs to senior citizen will be available to this porter

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड