आरोग्य विभागात भरतीचा मार्ग मोकळा

aarogya vibhag Bharti 2020

करोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत डॉक्टरांची भरती करण्याचा प्रलंबित मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांत मार्गी लावला आहे. पवारांच्या या निर्णयामुळे ९४ डॉक्टरांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, ९४ पैकी किती डॉक्टरांची भरती करायची याबाबत सरकारकडून स्पष्टता येणे बाकी आहे.

महापालिकेचा कामाचा निपटारा योग्य वेळेत होण्यासाठी आरोग्य, अग्निशमन आणि घनकचरा विभागातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ यांची भरती करण्याचा प्रस्ताव ८ नोव्हेंबर २०१७ला राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव गेली काही वर्षे वित्त विभागात प्रलंबित होता. ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर पालिकेला डॉक्टरांची उणीव भासत असल्याने अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रस्ताव मंजूर करण्याची गरज पवार यांच्या निर्दशनास आणून दिली. पवार यांनी प्रस्तावाची तत्काळ माहिती घेऊन वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पालिकेचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. त्यानुसार १२४८ रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली. अतिरिक्त आयुक्तांनी या वृत्ताला दुजोरा दिला असला, तरी अद्याप सरकारकडून लेखी आदेश आलेले नाहीत.

पालिकेने वर्ग एक ते चार यामध्ये १८९३ पदे रिक्त असल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. त्यापैकी ७५ टक्के म्हणजे १२४८ पदे भरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. पैकी ‘वर्ग एक’ची सरळसेवा पद्धतीने १२५ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी ९४ पदे तत्काळ भरण्याची मागणी करण्यात आली असून, त्यामध्ये डॉक्टर, तज्ज्ञांचा समावेश आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Vaishali lende says

    Bhandara ZP madhe ANM bharti kadhi honar aahe

    1. MahaBharti says

      Lavkch Suru honar aahe..

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप