मनपात कर्मचाऱ्यांची २,२०७ पदे रिक्त

2,207 Vacancies for employees of MNP

नाशिक महापालिकेत रिक्तपदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. पालिकेत आकृतिबंधानुसार 7,082 मंजूर पदांपैकी 4,875 अधिकारी, कर्मचारी असून 2,207 रिक्तपदे आहेत. अशा परिस्थितीत वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त होत असून, एकाच कर्मचार्‍याला अनेक पदांचा भार उचलावा लागत आहे तर दुसरीकडे अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे स्वेच्छानिवृत्तीकडे वाटचाल करीत असल्याने मनपाचे कामकाज कसे चालणार असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.

महापालिकेत अनेक वर्षांपासून नोकरभरती नाही, 2013 पासून पदोन्नती नाही आणि ज्येष्ठता यादीदेखील तयार नाही. या पार्श्वभूमीवर 20 लाख लोकसंख्येला सेवा देणे अतिशय कठीण बनले असल्याने नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास मनपा असमर्थ ठरू लागली आहे. दरम्यान, कामाचा अति ताण आणि लोकप्रतिनिधींकडून वाढत्या अपेक्षा यामुळे दबाव वाढत असल्यानेच स्वेच्छानिवृत्तीकडे कल असल्याचे बोलले जात आहे.

नाशिक मनपाचा कारभार विविध कारणांमुळे गाजत असून, आता त्यात वर्ग एक पदावरील स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याने नाशिकचा गाडा कोण हाकणार, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. अनेक अनुभवी अधिकारी हे विविध विकासकामांचे खरे शिल्पकार असून, त्यांच्या अनुभवाचा प्रशासनाबरोबरच जनतेलाही चांगला लाभ होत आहे. दोन हजार कोटी रुपयांच्यावर वार्षिक बजेट असणार्‍या या मनपाचे सारथी म्हणून काम करीत असताना अतिशय कल्पक आणि दूरदृष्टीने अधिकारी वर्ग हे मनापासून काम करीत आहेत. कुंभमेळ्यासारखे शिवधनुष्य लीलया पेलत विकासकामे करण्यात हातखंडा असणारा अधिकारीच आता बाहेर पडत असल्याने त्याचा परिणाम विकासकामांवर होणार असल्याचे काही जाणकार अधिकारी बोलत आहेत. एकाच अधिकारी आणि कर्मचार्‍याकडे अनेक पदांचा भार असल्याने नेमके मूळ पदावरचे काम करायचे की अतिरिक्त पदाचे काम करायचे अशा संदिग्धतेत सापडल्याने जबाबदारी पेलता-पेलता कुठल्याच पदाला न्याय देता येऊ शकत नसल्याची खंत संबंधित अधिकारी, कर्मचारी बोलून दाखवत आहेत.

सोर्स : पुढारी


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप